विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला. राज्यसभा व विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये सलग दोनदा पराभवाचा सामना महाविकास आघाडीला करावा लागलाय. याच पराभवाच यश पचवत असताना आता महाविकास आघाडीची सत्ता धोक्यात आल्याच राज्याच्या राजकारणात पाहायला मिळालं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला आज एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मोठ भगदाड पडल आहे. एकेकाळी शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतरमात्र पक्षासोबत बंड केलं आहे.
नेमकं काय घडल ?
शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या 25 पेक्षा जास्त गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा ही सुरु झाली होती. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती आज समोर आली. एकनाथ शिंदे 25 आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झालीय.
गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी आज अचानक नाराजीचा सूर लांबवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झोर का झटका च दिलाय, अस म्हणलं तरी वावग ठरणार नाही. शिंदे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेतलीय. या सगळ्या घटनाक्रमात आपल्या मुख्यमंत्री महोदयांचा मात्र आज पक्ष टिकवण्यासाठी आज चांगलाच कस लागल्याच चित्र दिसून आलय.
या सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन आज मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक सुरतमध्ये पोहोचले. तब्बल पाऊण तासांच्या प्रतीक्षेनंतर मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक यांनी एकनाथ शिंदे यांची भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ मात्र एकनाथ शिंदेनी पुन्हा शिवसेनेत यावं,अशी देखील ऑफर दिली मात्र शिंदेनी हि देखील ऑफर धुडकावून लावलीय.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये राहू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. भाजपशी सरकार स्थापन करावे, शिवसेनेनं भाजपशी युती केल्यास पक्षात राहू असेही ते म्हणाले. त्यांच्या या बंडखोरीनंतर मात्र आता शिवसेनेच्या पदरी निराशा पडली.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, 'मी पुन्हा येईन...', पण नंतरच्या काळात अशा काही राजकीय उलथापालथी झाल्या की त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं. त्याचं शल्य त्यांना होतच. त्यामुळे महाविकास आघाडीत फुट पाडून त्यांनी आपलाराजकीय डाव अचूक साध्य केलाय. मात्र आता घटनेने देवेंद्र फडणवीस यांचं मि पुन्हा येईन च स्वप्न साकार होण्याची चिन्हे मात्र दिसू लागलीत.
