बुधवार, ६ जुलै, २०२२

आरपीएफ महिला कॉंस्टेबल गर्भवती स्त्रीसाठी बनली देवदूत !

 मुंबई :

आई होण हे प्रत्येक स्त्रीसाठी भाग्याच असत. प्रत्येक स्त्रीसाठी तीच मुल हेच तीच जग असत.अश्याच एका महिलेच्या मदतीला एक महिलाच देवदूत बनून धावून आल्याची घटना घडलीय.  


रेल्वे (Indian Railway) प्रवासात असतानाच एका महिलेला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या, त्याच वेळी आरपीएफ (RPF) महिला कॉंस्टेबल या गर्भवती महिलेच्या मदतीसाठी देवदूतासारखी धावून आली .  तिने या महिलेला जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं. या महिलेची प्रसूती झाली असून ती आणि तिचे बाळ सुरक्षित आहे. या गर्भवती च्या मदतीला धावून आलेल्या महिला कॉंस्टेबलचे नाव ममता डांगी (Mamta Dangi) आहे.तिने केलेल्या या कामाच सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.



आज सकाळी 8.20 मिनिटांनी दिवा स्टेशन मास्तरकडून एक मेसेज आला आणि त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या ममता डांगी या महिला कॉंस्टेबलने जीआरपी स्टाफच्या मदतीने प्रसूतीच्या वेदना सुरू झालेल्या या महिला प्रवासीची मदत केली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. ममता डांगी यांच्या या कामाचं कौतुक रेल्वे प्रशासनाने केलं आहे.




मध्ये रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार (𝐂𝐡𝐢𝐞𝐟 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐑𝐞𝐥𝐚𝐭𝐢𝐨𝐧𝐬 𝐎𝐟𝐟𝐢𝐜𝐞𝐫 (𝐂𝐏𝐑𝐎), 𝐂𝐞𝐧𝐭𝐫𝐚𝐥 𝐑𝐚𝐢𝐥𝐰𝐚𝐲, 𝐌𝐮𝐦𝐛𝐚𝐢)यांनी याबाबत माहिती दिली असून त्यांनी ममता डांगी, आरपीएफ आणि जीआरएफ स्टाफच्या कामाचे कौतुक केलं आहे


 


मंगळवार, २१ जून, २०२२

एकनाथ शिंदेचं बंड महाविकास आघाडीला पडलं महागात ! 'ते' पुन्हा येणार ?

 

विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला. राज्यसभा व विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये सलग दोनदा पराभवाचा सामना महाविकास आघाडीला करावा लागलाय. याच पराभवाच यश पचवत असताना आता महाविकास आघाडीची सत्ता धोक्यात आल्याच राज्याच्या राजकारणात पाहायला मिळालं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला आज एकनाथ शिंदे यांच्या रूपाने मोठ भगदाड पडल आहे. एकेकाळी शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतरमात्र पक्षासोबत बंड केलं आहे.  




नेमकं काय घडल ?


 शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या 25 पेक्षा जास्त गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा ही सुरु झाली होती. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती आज समोर आली. एकनाथ शिंदे 25 आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झालीय.

 गेले काही वर्ष नाराज असलेले शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि त्याच्या गटाचे आमदार यांनी आज अचानक नाराजीचा सूर लांबवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झोर का झटका च दिलाय, अस म्हणलं तरी वावग ठरणार नाही. शिंदे यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक घेतलीय. या सगळ्या घटनाक्रमात आपल्या मुख्यमंत्री महोदयांचा मात्र आज पक्ष टिकवण्यासाठी आज चांगलाच कस लागल्याच चित्र दिसून आलय.

या सगळ्या नाट्यमय घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन आज मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक सुरतमध्ये पोहोचले. तब्बल पाऊण तासांच्या प्रतीक्षेनंतर मिलिंद नार्वेकर आणि संदीप फाटक यांनी एकनाथ शिंदे यांची भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊ मात्र एकनाथ शिंदेनी पुन्हा शिवसेनेत यावं,अशी देखील ऑफर दिली मात्र शिंदेनी हि देखील ऑफर धुडकावून लावलीय.

 यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी यावेळी रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी शिंदे यांनी महाविकास आघाडीमध्ये राहू नये, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. भाजपशी सरकार स्थापन करावे, शिवसेनेनं भाजपशी युती केल्यास पक्षात राहू असेही ते म्हणाले. त्यांच्या या बंडखोरीनंतर मात्र आता शिवसेनेच्या पदरी निराशा पडली.

 गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, 'मी पुन्हा येईन...', पण नंतरच्या काळात अशा काही राजकीय उलथापालथी झाल्या की त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं. त्याचं शल्य त्यांना होतच. त्यामुळे महाविकास आघाडीत फुट पाडून त्यांनी आपलाराजकीय डाव अचूक साध्य केलाय. मात्र आता घटनेने देवेंद्र फडणवीस यांचं मि पुन्हा येईन च स्वप्न साकार होण्याची चिन्हे मात्र दिसू लागलीत.

 

 

 

गुरुवार, १७ मार्च, २०२२

IMDb रेटिंग म्हणजे काय ? ती का महत्त्वाची ?


       चित्रपट पाहणे हा आपल्या सगळ्यांचा आवडता विषय आहे. आणि सध्या चित्रपट पाहण्याबद्दल लोकांची मानसिकता ही बदलत चालली आहे. त्यामुळे कोणती फिल्म पहावी आणि कोणती पाहू नये हे सांगण्याची गरज आता राहिली नाही. मार्च महिन्यामध्ये तर एकापेक्षा एक ब्लॉगबस्टर सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी आले आहेत. यामध्ये मराठीत आलेला पावनखिंड असो, किवा हिंदीमध्ये आलेले झुंड आणि त्यानंतर आलेला द काश्मीर फाईल्स असो. अनुपम खेर, मिथून चक्रवर्तीचा द काश्मीर फाईल्स थिएटरमध्ये धडकला आणि अक्षरश: भूकंप झाला. बॉलीवुडमध्ये एक आठवडाही किती मोठा आणि निर्णायकी असतो हे या तीन फिल्मच्या प्रदर्शनावरुन लक्षात येईल. झूंड बघून अस्वस्थ झालेला प्रेक्षक काश्मीर फाईल्स बघून मात्र संतप्त झालेला पहायला मिळतोय. 

     या चित्रपटाचे अनेक प्रेक्षक फार कौतुकही करत असल्याचे दिसत आहे. मात्र IMDb वर द काश्मीर फाईल्स रेटींगबाबत लोकांमध्ये नाराजी पाहायला मिळालीय. यापूर्वी IMDb ने या चित्रपटाला १० पैकी १० रेटींग दिले होते. मात्र आता IMDb  ने या रेटींगमध्ये घसरण करत ८.३ रेटींग दिले आहेत. यामुळे अनेकजण संताप व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    मात्र आता हे IMDb रेटिंग म्हणजे नेमक काय आहे हेच आपल्यातल्या बऱ्याच लोकांना माहित नसेल. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की एखाद्या चित्रपटाला IMDB वर 9 रेटिंग मिळाल आहे, 1 रेटिंग मिळाल आहे. मात्र अशा परिस्थितीत तुमच्या मनात हि हा प्रश्न येऊ शकतो की IMDB रेटिंग म्हणजे काय ? आणि यावर चित्रपटाचे मूल्यांकन कसे केले जाते ?  तर चला आज आपण याबद्दलच माहिती पाहणार आहोत. 



IMDb रेटिंग म्हणजे काय ? 

आयएमडीबी म्हणजेच इंटरनेट मुव्ही डेटाबेस. हा एक ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून त्यावर चित्रपट पाहणारे रसिकप्रेक्षक आपल्या रेटिंगद्वारे एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवतात. ही एक Amazon ची कंपनी आहे आणि तिचा ऑनलाइन मूव्ही हा डेटाबेस आहे. IMDb हा जगातील सर्वात मोठा इंटरनेट डेटाबेस आहे. जिथे हॉलीवूड, बॉलीवूड किंवा इतर कोणत्याही चित्रपट उद्योगाबद्दल माहिती मिळते. ही वेबसाईट इतकी लोकप्रिय आहे की चित्रपटाचे यश तिच्या रेटिंग आणि रिव्ह्यूनुसार पाहिले जाते

IMDb चे मालक कोण आहेत ?

IMDb ची सुरुवात 1990 मध्ये झाली होती, त्यावेळेस त्याचे नाव The Eyes होते आणि ते Col Needham ने बनवले होते, पण 2007 मध्ये Amazon ने ते विकत घेतले आणि नंतर या वेबसाईटचे मालकी हक्क Amazon कडे गेले. संपूर्ण इंग्लिश भाषेमध्ये हि वेबसाईट काम करते. IMDb या प्लॅटफॉर्मवर स्टार्स पद्धतीने कोणत्याही चित्रपटाला रेटिंग दिलं जातं. 10 हे सर्वाधिक रेटिंग असून चित्रपट, मालिका, अभिनेता/अभिनेत्री, वेब सीरिज, व्हिडीओ गेम्स अशा विविध गोष्टींना इथं रेटिंग देता येतं. आयएमडीबीचं रेटिंग जितकं अधिक तितका तो चित्रपट, मालिका किंवा वेब सीरिज लोकांना भावल्याची पोचपावती असते. या वेबसाईट वर रेटिंग 1 ते 10 पर्यंत रेटिंग दिल जात. इथे  कोणताही युजर आपल Account तयार करून कोणत्याही नवीन चित्रपट किंवा कोणत्याही मालिकेबद्दल त्याचा रीव्ह्यू किंवा रेटिंग शेअर करू शकतो. आजच्या काळात फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित 10.4 दशलक्षाहून अधिक लोक याच्याशी जोडले गेले आहेत. जगभरात कोठूनही युजर्स त्यांनी पाहिलेल्या चित्रपटाला बसल्या बसल्या रेटिंग देऊ शकतात.


चित्रपटाचला  रेटिंग कसे द्यावे ?

कोणत्याही चित्रपटाला रेटिंग देण्यासाठी तुम्ही IMDb च्या वेबसाईटवरून थेट तुमचं  Account  तयार करू शकता आणि कोणत्याही नवीन चित्रपट किंवा तुमच्या आवडत्या चित्रपटाबद्दल तुमचे मत देऊ शकता. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही शेअर करत असलेले रेटिंग चित्रपटाचे यश - अपयश ठरवत असत. 

रेटिंग करण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा..

१.

तुम्ही चित्रपट पाहिल्यावरच तुमची रेटिंग किंवा review द्यावा,

नेहमी प्रामाणिकपणे रेटिंग करा.

नेहमी चित्रपटाच्या कथेनुसार, अभिनयानुसार आपल रेटिंग आणि रिव्ह्यू द्यावा.


IMDb वर account तयार करणे खूप सोपे आहे, तुमच्याकडे Amazon, Google, Facebook, Twitter, Apple चे account आहे. त्यामुळे तुम्ही थेट लॉगिन करू शकता अन्यथा account तयार करून लॉग इन करू शकता. ज्या पद्धतीने तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर आणि वापरल्यानंतर रेटिंग देता, तीच पद्धत तुम्हाला इथेही वापरायची आहे. 


चित्रपटाला रेटिंग देण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ?

तुम्ही IMDb  च्या  वेबसाइटवर गेल्यास, तुम्हाला त्यात साइन-इन करावे लागेल.

तुमच्या Gmail आयडीने साइन इन केल्यानंतर, तुम्हाला IMDB च्या डॅशबोर्डवर नेले जाईल.

त्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला रेट करायचा असलेला चित्रपट शोधा.

यानंतर चित्रपटाच्या पेजवर जाऊन 'रेट हिअर' पर्यायावर क्लिक करा.

आता तुमच्या आवडीनुसार 1-10 क्रमांकाच्या दरम्यान रेटिंग द्या.


हि प्रोसेस केली कि झाल तुमचं रेटिंग देऊन. अश्या पद्धतीने हि IMDb वेबसाईट काम करते. आणि येणारया नवनवीन चित्रपटाच यश इथेच ठरत. जर तुम्हालाही, तुमच्या आवडत्या चित्रपटाला रेटिंग द्यायचे असेल तर आजच हि प्रोसेस follow करा.  


मंगळवार, १२ फेब्रुवारी, २०१९

निवडणुकांचे भाकित


निवडणुकांचे भाकित....
निवडणूक हां शब्द ऐकला की सामान्य माणसाचा हसरा चेहरा गंभीर होताना अनेकदा पाहायला मिळतो.वास्तविक पाहता लोकशाहीप्रधान देशात हां शब्द कानी पड़ताच कोनतेच प्रश्न
उमटन्याची गरज नाही परंतु प्रश्न उमटतात आणि उत्तर मात्र मतदान पेटीतच राहतात.सध्याच्या काळात तरी न आवडणारी प्रक्रिया म्हणजे निवडणूक...अशी जणू व्याख्याच होऊन बसली आहे निवडणुकांची किंबहुना व्याख्याच नव्हे तर शब्द जरी कानावर पडला तरी आश्वासनाची गाजरे नजरेसमोर अभी ठाकतात.मागील काळात ग्रामपंचायत निवडणुकांची  रणधुमाळी पार पडली.कुठे कांग्रेसने बाजी मारली तर कुठे बिजेपीने,बाजी तर कुठला ना कुठला पक्ष मारतोच हो,पण ती बाजी मात्र सत्ता काबिज करण्यासाठी आपल वर्चस्व स्थापन्यासाठी....
भारतात अनेक जवान देशभक्त होऊन ं गेले ज्यांनी राष्ट्रापती आपल कर्तव्य पूर्ण करून समाजाला बाजी मारण या शब्दाचा अर्थ शिकविला...शिवरायांच्या मावळ्यांनी तर आपल्या कर्तव्य आणि निष्ठेसाठी प्राणांची बाजी लावली मात्र कधीही जात - पात,पक्ष असा भेद ठेवला नाही.आता तर राजकारणात इतक्या पक्षांचा उदय  झालाय की,नेमका कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे हे सामान्य नागरिकांना  समजण कठिन बनत चाललय आणि पक्षांतर करन ही तर फॅशनच बनली आहे.या सगळ्या गिरगिट प्रवृत्तित बळी पड़तो सामान्य माणूस.
निवडणूक प्रक्रियेत मतदार हा राजा मानला जातो,मतदान करण्यासाठी 18 वर्ष पूर्ण आसन गरजेच आहे.प्रत्येक  नागरिकाने आपले मूलभूत हक्क  ओळखून मतदान करायलाच हव.देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी  मतदान हे कारायलाच हवं आणि प्रत्येक नागरिकाला आपल्या हक्काची जाण देखील झाली पाहिजे तेव्हाच लोकशाहीप्रदान  राष्ट्राच्या बळकटीकरणासाठी मतदारांचा हातभार लागला अस समजता येईल.
निवडणुुकीची व्याख्या करायची झाली तर एखाद्या संस्थेच्या वैध सभासदानकडून त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची किंवा प्रतिनिधिंची संस्थेने ठरविलेल्या पदासाठी जी निवड केली जाते त्या प्रक्रियेला निवडणूक म्हणुन संबोधतात.ज्या समाजात निवड करण्याचे स्वातंत्र्य असते त्या समाजात निवडणूक यंत्रणा सत्तेशी संबंध प्रस्थापित करतात.हे संबंध व्यवस्थितरीत्या प्रस्थापन्यासाठी उमेदवाराने देखील काही गोष्टी लक्षात घ्यायला ह्व्यात,ज्या जनतेच्या मतांची गरज आपल्याला भासते आणि असते,त्या जनतेला ही आपल्याकडून शहराच्या विकासासाठीच्या अनेक अपेक्षा असतात.आपल्याला मत देताना त्या माय - माऊलींच्या डोळ्यात पण अपेक्षेचे प्रतिक उमटलेले  पाहायला मिळत,सध्या काही गावात नगरसेवक पदासाठी रणधुमाळी  चालु आहे.अनेक उमेदवार नगरसेवक पदासाठी उभे आहेत.जोरदार प्रचारसभा चालु आहेत.प्रचारासाठी खुप सुंदर पद्धत ही लोक वापरतात.मागील वर्षभरात आपण केलेल्या एक ते दोन विकासकामांना इतक उच्च स्थान देतात ,की घरोघरी जाऊन आपण वर्षातील 365 दिवसांत केलेल्या एक  - दोन कामांची गणना  ही इतर कोणीच करू शकत नाही अस एका क्षणापुरत वाटतं. याचवेळी ते भवीष्यात आपल्याला आसपास परिसरात काय सुधारणा होतील याचं ज्योतिषशास्त्र शिकवतात.काही काही सुशिक्षित तर थेट मतदानाच्या दिवशीच आणी अगोदरही थेट मतदानाचा पवित्र हक्क नागरिकांकड़ून पैसे देऊन खरेदी करतात.😢..एकीकडे जीवन जगताना येणाऱ्या अडचणी आणि दुुसरीकडे समाजात वावरन्याची भीती या दोन्हींच्या गर्तेत सापडलेला मनुष्य नेमका इथेच गोंधळात पडतो आणि याचठिकाणी आपला हक्क गमावून बसतो. काही काही ठिकाणी तर अस अनुभवायला मिळालय की,आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियां पुढे आहेत या उक्तिखाली राजकारणात स्त्रीयांनाही पुढे करून निवडणूक लढविली  जाते.दिसायला स्री सत्ताधीश दिसते.परंतु वास्तविकता ही असते की, त्या दिसणाऱ्या चेहऱ्यामागेसुध्दा निर्णय घेण्याची प्रक्रिया हां एक पुरुष करत असतो.ज्या नागरिकांच्या कल्याणाची ग्वाही आपण प्रचार करताना देत असतो...त्याच जनतेच्या कल्याणासाठी काही पदांवर आरूढ़ असणाऱ्या व्यक्तिंना त्या जनतेसमोर एक शब्दही कार्यक्रमात ,मीडियासमोर किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी व्यवस्थितपणे बोलता येत नाहीआणी जर बोललेच त्यातही  त्यांच्याच शौर्याची गाथा ऐकावी लागते.बऱ्याच ठिकाणी शैक्षणिक पात्रता आणि जनतेच्या विकासासाठी लागणारी योग्य विचारसरणी यातील एकही बाब या सरंजामदारांकड़े नसते. हे राहत असलेल्या वॉर्डमधील  नागरिकांचे प्रश्न नेमके काय आहेत, त्यांना काय हव आहे आपल्याकडून याचा विचार ही मंडळी कधी करणार ? हां कुलुपात बंदिस्त असलेला प्रश्न आहे.प्रश्न अनेक आहेत पण उत्तर देणार कोणीच नाही,असो,या  सगळ्या विचारातून एक महत्वाची गोष्ट सांगावीशी वाटते,निर्णय आणि प्रसंग कुठलाही असो,"हमेशा अपने दिल की सुनना"  ,,,.
कवी विंदा करंदीकरांची खुप छान कवितेच्या ओळी इथे सांगाव्याश्या वाटतात....
' असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून अत्तर,
नजर रोखुनी नजरेंमध्ये  आयुष्याला द्यावे उत्तर....'
प्रियंका पुंड.